मुंबई – उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी काहींना काही कारनामे करत असते. मग कधी ती अतरंगी ड्रेस घालते तर कधी काहीतरी स्टेटमेंट करते. बोल्डनेसबाबतच्या सर्व सीमा तर उर्फीने केव्हाच ओलांडल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतीच उर्फीने बोल्ड ड्रेस परिधान करून एका ठिकाणी हजेरी लावली होती त्यावेळी तीन असं काही कृत्य केलं की तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की उर्फी जावेद तिच्या ड्रेसच्या आतून काहीतरी बाहेर काढते आणि नंतर परत आत ठेवते. ही गोष्ट काय आहे हे कोणालाही समजू शकत नसले तरी. उर्फीच्या या विचित्र स्टाइलवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य केल्याने काही लोक तिला चुकीचे ठरवत असताना चाहते मात्र तिच्या या स्टाईलला कूल म्हणत आहेत.
View this post on Instagram
एका कार्यक्रमा आधीच हा व्हिडीओ असल्याचे समजते. ब्लॅक ड्रेसमध्ये उर्फी एकदम बोल्ड दिसत असल्याने तिने मीडियासाठी देखील पोज दिली आणि त्याचवेळेस हा प्रकार मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. खरं तर, उर्फी तिच्या कामापेक्षा केवळ हटके कपड्यांमुळेच चर्चेत असते.यावेळीही ती आपल्या कृतीमुळे चर्चेत आली. मात्र यावेळी तिने काय काढले होते हे स्पष्ट न झाल्याने अनेकांनी सोशल मीडियावर तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे.