पवन मावळातील “भानामती’प्रकरण : “अंनिस’कडून घटनेची दखल

कार्ला – पवन मावळातील तुंग येथे मंगळवारी (दि. 3) भानामतीचा प्रकार उघडकीस आला. ग्रामीण भागात अंधश्रद्धेला खतपाणी काढणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. या प्रकरणाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने शुक्रवारी (दि. 6) दखल घेतली. तुंग परिसरातील झाडाला छायाचित्र, लिंबू, नारळ लावून केलेल्या करणीच्या प्रकाराबाबत लोणावळा पोलिसांकडे जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

या संदर्भात अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी तुंग या गाव तक्रारदारासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ आदी वस्तु आढळून आल्या अरहेत. याशिवाय तुंगचे पोलीस पाटील गणेश ठोंबरे यांच्याशी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

या प्रकरणात लक्ष घालून सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार पांडुरंग कृष्णा जांभूळकर, योगेश श्रीराम घाटगे, संदीप एकनाथ पाठारे, संजय धोंडू कोकाटे, किसन बंडू ठोंबरे, संतोष कोंडिबा घारे, अजयकुमार मेहता, कौशर अब्दुल शेख, मनोज सेनानी यांनी केली आहे.

लोणावळ्यातील अंनिसचे पदाधिकारी पांडुरंग तिखे यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांची भेट घेऊन केलेल्या कारवाईबद्दल त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.