जलपैयगुडी – पश्चिम बंगालच्या जलपैयगुडी जिल्ह्यात चहाच्या मळ्यात काम करणारे 24 मजुर अंगावर विज पडण्याच्या दुर्घटनेत जखमी झाल्याची घटना काल घडली. त्यात 17 महिला मजूर आहेत. डायना टी गार्डन भागात ही घटना घडली.
या सर्वांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावर माल येथील सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल त्या भागात अचानक पाऊस सुरू झाला आणि विजेचा मोठा गडगडाट झाला. त्यावेळी हे मजूर चहाच्या मळ्यात पाने काढण्याच्या कामात व्यस्त होते.
धुपगरी भागातील चमुरची टी गार्डन मध्ये काम करणारे 7 जणही अशाच प्रकारात जखमी झाले आहेत. सध्या त्या भागात चहाच्या मळ्यातील कामांचा मोसम सुरू आहे, त्यामुळे हे मजुर तेथे मोठ्या प्रमाणात काम करीत असतात.