‘बेल की मग पुन्हा जेल..’; आर्यन खानच्या जामीनावर आज पुन्हा सुनावणी

मुंबई  – हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आणि ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या ‘आर्यन खान’च्या बाजूला सध्या “तारीख पे तारीख, तारीख पे तारीख…’ हा डायलॉग वाट्याला आला आहे.

जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाहीये. काल (दि. २६) सुद्धा आर्यनचा जमीन फेटाळण्यात आला होता.

यावेळी एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. त्यामुळे आज (दि. २७) पुन्हा या विषयी निर्णय होणार आहे. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल की मग पुन्हा जेल याचा फैसला होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.