वाघोली – येथील गायरान जमिनीवरील बांधकामांच्या नोंदी कराव्यात, यासाठी वाघोली ग्रामपंचायतीसमोर पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 17) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी वाघेश्वर नगर, सुयोग नगर, बजरंग नगर, बुरुंज आळी, इंदिरानगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत मंगळवारी (दि. 25) सभा घेण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये विषय घेवून बांधकामांच्या नोंदी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्यानंतर घंटानाद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
परवानगी नसतानाही आंदोलन केल्याने पाच जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.