पिंपरी -घरासमोरील अंथरूण काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ करीत एकावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना 4 मे रोजी रात्री ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.
प्रदीप नारायण सोनकवडे (वय 56, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी शनिवारी (दि. 9) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनेश उपाध्ये, त्याची पत्नी आणि दिनेशचा मित्र (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी फिर्यादी प्रदीप यांच्या घरासमोरील गॅलरीत अंथरूण टाकले. प्रदीप यांच्या पत्नीने आरोपीच्या पत्नीला अंथरून काढण्यास सांगितले. याच्या राग मनात धरून आरोपींनी प्रदीप यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, आरोपी दिनेश याने घरातील भाजीपाला कापण्याच्या चाकूने प्रदीप यांच्या गालावर वार केला.