शिक्रापूर -येथे घरी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून एका 18 वर्षीय युवकाने घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. निखील गणेश शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
तर गणेश नाना शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.