पिंपरी – परपुरुषासोबत बोलल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला गॅसच्या पाइपने मारहाण केली. तसेच विवाहितेला टोचून बोलत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 15 डिसेंबर 2007 ते 15 मे 2020 या कालावधीत सुसगाव येथे घडली.
याबाबत 30 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप सुदाम भोते, सुहास सुदाम भोते, पुष्पा सुदाम भोते (सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला परपुरुषाशी बोलल्या या कारणावरून आरोपी संदीप याने गॅसच्या पाईपने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. त्यात फिर्यादी यांच्या हातापायावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी सुहास याने “तुला उभी चिरून टाकू’ अशी फोनवरून धमकी दिली. तसेच आरोपी पुष्पा यांनी वारंवार टोचून बोलून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.