मुंबई – सौदर्यं हे नजरेत असतं, ते अनुभवण्यासाठी स्वच्छ आणि निर्मळ असं मन माणसाकडे असावं लागतं. स्त्रीचं सौंदर्य तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतं. अनेक जण तिच्या याच सुंदरतेला भाळतात आणि तिच्या प्रेमात पडतात. पण एखाद्या महिलेच्याही हनुवटीवरती बारकशी दाढीसदृश्य लव दिसली तरी आपली नजर भिरभिरते.
View this post on Instagram
इंटरनेट आणि सोशल मीडियावर एक दाढीवाली महिला अशीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेचा विषय ठरते. मिशी आणि दाढी असणाऱ्या ‘या’ सुंदर तरुणीचा फोटो जर तुम्ही पाहिला तर, तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. कारण, पुरुषांसारखी मिशी-दाढी असनूही ती अफाट सुंदर दिसते.
View this post on Instagram
या सुंदर स्त्रीचं नाव आहे “हरिनाम कौर’. हरिनाम बद्दल सांगायचं झालं तर, ही जगातील 14 विशेष महिलांपैकी एक आहे. ज्या महिलाच असतात परंतू त्यांचे शरीर पुरुषांसारखे असते. हरिनाम कौर ही सध्या इंग्लंडमध्ये राहते. तिच्या या अनोख्या सुंदर चेहऱ्यामुळे ती कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियामध्ये व्हायरल होत राहतात.
View this post on Instagram
जगभरातील विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक’मध्येही हरिनाम कौर हिचं नाव नोंदविण्यात आलं आहे. हरिनाम ही एक यशस्वी मोटिवेशनल स्पीकर आणि एक माॅडेल आहे. लोक तिला पाहण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. जगातील कित्येक नामांकित संस्थांनी तिचा फोटो कव्हर फोटो म्हणूनही प्रसिद्ध केलेला आहे.
View this post on Instagram
हरिनाम कौर बरोबर एक सेल्फी मिळावा यासाठी अनेक जण तरसतात. पण हरिनाम हिच्या चेहऱ्यावर दाढी-मिशी कश्यामुळे आली असा सवाल अनेकांना पडतो. वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर, हरिनाम जेव्हा 12 वर्षांची होती, त्यावेळी तिला “पाॅलिसिस्टिक ओवरी सिड्रोम’ नावा आजार झाला. याच कारणामुळे इतर मुलींच्या तुलनेत हरिनामच्या शरीरावरील केस जास्ती वेगाने वाढू लागले.
View this post on Instagram
मुलांप्रमाणे तिला चेहऱ्यावर दाढीही आली. दाढीमुळे तिला खूपच अपमानास्पद वागणूक मिळाली. शाळेत, समाजात तिचे मित्र, लोक तिची खिल्ली उडवत असत. यात तिच्या जवळच्या लोकांचाही समावेश असे. मात्र, कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता तिची कमजोरी आज तिची ताकद झाली आहे. चेहऱ्यावर केस येऊ नये साठी हरिनामने अनेक क्रीम आणि वैद्यकीय उपाय सुद्धा केलं. पण, काहीच फायदा झाला नाही. शेवटी हरिनामने चेहऱ्यावरील केस कापणं बंद केलं. आणि स्वतःला जशी आहे तसं स्वीकारलं.
View this post on Instagram