अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयनं केली ‘या’ 4 खेळाडूंच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी भारताच्या वर्ल्ड कप संघातील सदस्य फिरकीपटू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावाची शिफारस केली आहे.

बुमराहने 49 एकदिवसीय सामन्यांत 85 विकेट्स घेतल्या आहेत तर शमीने 63 एकदिवसीय सामन्यांत 113 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर अष्टपैलू रविंद्र जडेजाने 151 एकदिवसीय सामने खेळले असून गोलंदाजीत त्याने 174 विकेट घेतल्या आहेत तर फलंदाजीत 2035 धावा केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम यादव हिने 41 एकदिवसीय सामने तर, 54 टी-20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, अर्जुन पुरस्कार 1961 साली सुरु करण्यात आला होता. अर्जूनाची मुर्ती आणि 5 लाख रुपये रोख असे या बक्षिसाचे स्वरुप आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.