आमदार दत्तात्रय भरणे यांची हर्षवर्धन पाटलांवर जोरदार टीका
रेडा – हर्षवर्धन पाटील तुम्ही राज्यात मंत्री पदावर होता, किमान तुम्ही तुमच्या बावडा गावाचा तरी विकास करायला पाहिजे होता. तुम्हाला तुमच्या गावाचा विकास करता येत नाही आणि इंदापूर तालुक्याचा काय विकास करणार? अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. दरम्यान, सभदरम्यान पाऊस बरसत होत तरी एकही मतदार जागेवरून न उठता भरणे यांचे भाषण एक टक श्रवण करीत होता.
इंदापूर विधानसभा मतदरसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे निमगाव केतकी येथील जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, प्रताप पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रेय शेंडे, युवक नेते दशरथ डोंगरे, तात्यासाहेब वडापुरे, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, गफूर सय्यद, दत्तात्रेय बाबर, बाळासाहेब करगळ, समीर मोरे, छाया पडसळकर, डॉ. अर्चना पाटील, मामा पाटील, दादाराम शेंडे, शुभम निंबाळकर, पांडुरंग हेगडे, संदीप भोंग, शंकर मिसाळ, महादेव भोंग, कोंडीबा भोंग, अभिजीत रणवरे पाटील, आशपाक पठाण, विठ्ठल राऊत, आझाद मुलाणी, नबीलाल शेख, मोहम्मद शेख यांच्यासह पदाधिकारी, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले की, निष्क्रिय आमदार म्हणून विरोधक माझ्यावर नाहक टीका करतात; परंतु या विरोधी मंडळींना निष्क्रियतेचा अर्थ कळलेला नाही. मी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी 1300 ते 1400 कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणत असेल तर निष्क्रिय कोण? मंत्रिमंडळात होता तेव्हा कळले नाही का 22 गावातील शेतीला पाणी आणायचे? त्यावेळी शेतकऱ्यांचा कळवळा तुम्हाला का आला नाही? असा सवाल त्यांनी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना उपस्थित केला.
फुले पगडी देऊन भरणेंचा सत्कार
इंदापूर तालुक्यातील मुस्लीम व माळी समाजाच्या वतीने आमदार भरणे यांना पाठिंबा देत फुले पगडी देऊन सन्मान करण्यात आला.
पाणी आणणारा मामा…
निमगाव केतकी गावची पाणीपुरवठा योजना मी मंजूर केलेली आहे. तरी विरोधक या योजनेचा नारळ फोडण्यासाठी गेले असता येथे उपस्थित असणाऱ्या ज्येष्ष्ठांनी सांगितले की, पाणी आणणारे मामा आहे आणि तुम्ही कोण नारळ फोडणारे? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला त्यामुळे तालुक्यातील जनता माझी आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा टोला आमदार भरणे यांनी लगावला.