बारामती, (प्रतिनिधी)– शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद् जेवरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रभारी संपर्क प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सुरेंद्र जेवरे यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्याकडे ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली आहे. शिवसेनेचे संपर्क नेते तथा सचिव संजय मशिलकर यांनी बारामती येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली.
सुरेंद्र देवरे यांना संपर्कप्रमुख केल्यानंतर महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथील जिजाई निवासस्थानी आयोजित बैठकीत जिल्हा प्रमुख जेवरे यांची प्रभारी संपर्कपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे व जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित होते. सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी सुरेंद्र जेवरे यांचे अभिनंदन केले, सुरेंद्र जेवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपर्क नेते संजय मशिलकर यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. -सुरेंद्र देवरे, पुणे जिल्हा प्रमुख, शिवसेना.