पिंपरी, (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या सयुक्त जयंती महोत्सवनिमित्त “रन फॉर भीमथोन” या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी रहाटणीतआयोजन करण्यात आले आहे.
१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ ते ८ छत्रपती संभाजी महाराज उद्यानसमोर कोकणे चौक येथे या अर्ध मॅरेथॉन आयोजित केली आहे. ही स्पर्धा शांती, प्रेम, मैत्री आणि करूणा चा संदेश देण्यासाठी सर्व वयोगटासाठी तीन, पाच किलोमीटर अंतरावर होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यास टी-शर्ट, अल्पोहार दिला जाणार आहे. तर १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळीत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून बाल गोपालांना धमाल, मस्ती, मनोरंजन यावेळी करता येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे संथापक अरुण चाबुकस्वार यांनी केले असून संस्थेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत (9921695242) व फहाद खान (9545247559) यांच्याशी सहभाग नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आवाहन चाबुकस्वार यांनी केले आहे.