जळोची | बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी 2021 मध्ये NEET या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी अव्वल आले आहेत. यामध्ये वर्षा घाडगे या विद्यार्थ्यांनीला ओव्हर आॅल विषयात 720 पैकी 622 मार्क्स मिळाले आहेत.तर बायोलॉजी विषयात 360 पैकी 355 मार्क मिळाले आहेत.प्रतिक कुंभार या विद्यार्थ्यांला over all विषयात 720 पैकी 603 मार्क्स मिळाले आहेत.तर बायोलॉजी विषयात 360 पैकी 355 मार्क मिळाले.
सोबतच NEET ओव्हर आॅल विषयात अकॅडमीचे 2 विद्यार्थी 600 मार्कच्या पुढे आहेत.तर 8 विद्यार्थी 543 मार्कच्या पुढे आहेत व 12 विद्यार्थी 500 मार्कच्या पुढे आहेत..तसेच 12 विद्यार्थी बायोलॉजी विषयात 300 मार्कच्या पुढे आहेत. या यशाचे कौतुक करीत असताना क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक काळे सर व घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वर्षा घाडगे या विद्यार्थ्यांनीला ओव्हर आॅल विषयात 720 पैकी 622 मार्क्स मिळाले आहेत. वर्षा घाडगे ही विद्यार्थिनी शेतकरी शेतमजूर कुटुंबातील आसुन अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले आहे. या विद्यार्थिनीचा संपूर्ण वर्षाचा खर्च अकॅडमी ने केलेला आहे. अकॅडमी ने या विद्यार्थिनीला दत्तक घेऊन संपूर्ण वर्षासाठी येणारा हॉस्टेल , मेस आणि इतर खर्च केला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा निकाल हा दरवर्षी चांगला लागत आसतो याहीवर्षी अकॅडमीने ही यशाची परंपरा अबाधित राखून आपले नाव गुणतालिकेत अव्वल ठेवले आहे यावर्षी NEET या परिक्षेत अकॅडमीच्या विद्यार्थींनी घवघवीत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांसह अकॅडमीचे सर्वत्र कौतुक होत आहे.