जळोची- आज सकाळपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार बारामतीतील भिकोबानगर येथील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ६५ पैकी ६३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल बारामती मधील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील ६५ नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी ६३ निगेटिव्ह आलेले आहेत. येथील एक ६४ वर्षीय पुरुष रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे.