रांजणगाव गणपती -मास्क न वापरणाऱ्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत 15 हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. रांजणगाव ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनने ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्या मार्गदर्शनानुसार अनिल चव्हाण, सहदेव ठुबे, विजय शिंदे, राजू वाघमोडे, भाग्यश्री चव्हाण यांनी सहभाग घेतला.