नगर – मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंच यांचीच नेमणुक करावी व सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही राजकीय पक्षाकडुन होणारा घोडे बाजार थांबवावा, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. करोना महामारी च्या प्रसंगी प्रत्यक गावाने विद्यमान सरपंच यांच्या च नेतृत्वा खाली यशस्वी लढा दिला आहे. त्याच बरोबर अनेक विकास कामे सुरु आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही पक्षाकडुन घोडेबाजार च्या आधारावर जर प्रशासक यांच्या नेमणुका जर झाल्या तर विकास कामाना खिळ बसेल व गावाची राजकीय सामाजिक घडी विस्कटेल. त्यामुळे विद्यमान सरपंच यांना च प्रशासक म्हणुन नेमले पाहिजे, अशी मागणी बेरड यांनी केली आहे.