बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात करोनामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांपेक्षा घरोघरी बाप्पा बसवण्यावर नागरिकांनी भर दिला आहे.
राजुरी, जाधववाडी, बोरी बुदुक, साळवाडी, शिरोली, सुलतानपुर, भोरवाडी, कांदळी वडगाव, अणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा, साकोरी, मंगरूळ, पारगाव, निमगाव व परिसरातील गावातील नागरिकांनी गणपती बाप्पांचे जोरदार स्वागत केले.
करोनाचे सावट असल्याने शासणाने चार फुटांच्या पुढे बाप्पांच्या मूर्ती बसवण्यास बंदी घातल्याने जवळपास सर्वच मंडळाच्या मूर्ती एक फुटापासून चार फुटापर्यंतच होत्या. तर सर्वच मंडळाचे कार्यकर्ते शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत होते.
राजुरी येथील पंचरंगी भावकी, सुयोग, संभाजी राजे आदी गणेश मंडळ अतिशय साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करणार आहेत.