#BANvPAK | पाकिस्तान-बांगलादेश कसोटी रंगतदार स्थितीत

ढाका – पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतरही बांगलादेशचा दुसरा डाव गडगडल्यामुळे हा सामना रंगतदार स्थितीत आला आहे. रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशची दुसऱ्या डावात 4 बाद 39 अशी बिकट स्थिती झाली असून ते केवळ 83 धावांनी आघाडीवर आहेत. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान व बांगलादेश दोन्ही संघांना संधी आहे.

बांगलादेशने पहिल्या डावात लिंटन दासचे शतक व मुशफिकुर रहिमच्या 91 धावांच्या खेळीच्या जोरावर 330 धावा उभारल्या. तसेच गोलंदाजीतही चमक दाखवताना पाकिस्तानचा पहिला डाव 286 धावांवर रोखत 34 धावांची आघाडी घेतली होती. अबीद अलीने दमदार शतकी खेळी केली मात्र, संघाला आघाडी मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अब्दुल्ला शफीकनेही अर्धशतक फटकावले.

बांगलादेशकडून तैजुल इस्लामने 7 गडी बाद करत पाकिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. मात्र, दुसरा डाव सुरू झाल्यावर पाकिस्तानच्या शाहीन आफ्रीदीने त्यांच्या प्रमुख फलंदाजांना अपयशी ठरवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांच्या दुसऱ्या डावात 19 षटकांत 4 बाद 39 धावा झाल्या आहेत. दिवसअखेर मुशफिकुर रहिम 12 तर, यासिर अली 8 धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रीदीने 3 बळी घेतले तर, हसन अलीने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक – बांगलादेश पहिला डाव – 330. पाकिस्तान पहिला डाव – 115.4 षटकांत सर्वबाद 286 धावा. (अबीद अली 133, अब्दुल्ला शफीक 52, फहीम अश्रफ 38, तैजुल इस्लाम 7-116, इबादतुसेन-47, मेहदी हसन 1-68).
बांगलादेश दुसरा डाव – 19 षटकांत 4 बाद 39 धावा. (सैफ हसन 18, मुशफिकुर रहिम खेळत आहे 12, यासिर अली खेळत आहे 8, शाहीन आफ्रीदी 3-6, हसन अली 1-19).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.