पुणे – डेक्कन जिमखाना आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलींच्या गटात गौरी माणगावकर, आन्या जेकब यांनी तर मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या जैष्णव शिंदे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम पात्रता फेरीत गौरी माणगावकर हिने कायरा चेतनानीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. आन्या जेकबने कशिश बोटेचा 5-7, 6-2, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
चौथ्या मानांकित संजीवनी बॅनर्जीने धनश्री पाटीलचे आव्हान 6-0, 6-2 असे संपुष्टात आले.
मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित जैष्णव शिंदेने आठव्या मानांकित आकर्ष गावकरला 6-3, 6-0 असे पराभूत केले. सहाव्या मानांकित रेथीन प्रणव सेंथीलकुमारने तरुण पोरवालचा टायब्रेकमध्ये 1-6, 7-6(5), 10-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली.
संक्षिप्त निकाल (अंतिम पात्रता फेरी) :
मुली : गौरी माणगावकर (भारत) वि. वि. कायरा चेतनानी (भारत) 6-2, 6-3. आन्या जेकब (भारत) वि. वि. कशिश बोटे (भारत) 5-7, 6-2, 10-7. समायरा मलिक (भारत) वि. वि. श्रीनिधी बालाजी (भारत) 6-3, 6-2. संजीवनी बॅनर्जी (भारत) 4 वि. वि. धनश्री पाटील (भारत) 6-0, 6-2.
मुले : रेथीन प्रणव सेंथीलकुमार (भारत) 6 वि. वि. तरुण पोरवाल (भारत) 1-6, 7-6 (5), 10-5. विनीत मुत्याला (भारत) वि. वि. प्रज्वल तिवारी (भारत) 6-2, 6-3. जैष्णव शिंदे (भारत) वि. वि. आकर्ष गावकर (भारत) 6-3, 6-0. भूषण हबम (भारत) वि. वि. निशित रहाणे (भारत) 6-3, 6-2.