#TeamIndia | निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे पंड्याकडून जाहीर

मुंबई – भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दीक पंड्या याने पुढील काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळेच त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी आगामी काळात संघ निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे.

तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणार असल्याने आगामी मालिकांसाठी माझा विचार करू नये, असे त्याने आपल्या इमेलमध्ये म्हटले आङे. पाठीच्या दुखापतीमुळे 2019 साली झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पंड्या भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी गोलंदाजी करू शकला नाही.

लवकरात लवकर पूर्ण तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याइतका सक्षम व्हायचे असल्याने त्याने निवड समितीला वेळ मागितला आहे.

पंड्याने टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतही पाचपैकी केवळ दोनच सामन्यात गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करु शकेल इतका तंदुरुस्त नसल्यामुळे पंड्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात संथान देण्यात आले नव्हते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.