Bandhan Bank Recruitment 2022: बंधन बँकेने डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. यासाठी त्यांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ncs.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे. डेटा एंट्री ऑपरेटरच्या 39 पदांच्या भरतीसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत.
मान्यताप्राप्त बोर्डाचे 12वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर 18 ते 29 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज कसा करायचा –
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम NCS च्या पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ओळखपत्राद्वारे नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा, ऑनलाइन अर्ज भरा आणि सबमिट करा. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकतात.
तसेच, भरतीसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा अर्जातील कोणत्याही तक्रारीसाठी, उमेदवार बँकेच्या एचआर विभागाशी संपर्क साधू शकतात. यासाठी पोर्टलवर 9748330338 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय, सर्व तपशील भरती अधिसूचनेत उपलब्ध असतील. ज्याची थेट लिंक खाली देत आहे.