कराड – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज तहसीलदार कार्यालयात मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.15 वाजता दाखल करणार आहेत. स्व. पी. डी. पाटील यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थान पासून कृष्णा नाका सर्कलमार्गे स्टेशन रोडने दत्त चौक व तेथून तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी 2 ते 6 या वेळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी स्टेडियम लगतच्या लिबर्टी क्रीडांगणावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील मित्र परिवाराने केले आहे.