बहारीनचे युवराज बिन सलमान अल खलिफा यांचे निधन

दुबई – बहारीनचे युवराज खलिफ बिन सलमान अल खलिफा यांचे अज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहणारे पंतप्रधान म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येतो. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 2011 मध्ये त्यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ते पंतप्रधान पदावर कायम राहिले होते.

युवराज खलिफ बिन सलमान अल खलिफा यांच्या निधनाबबत बहारीनमधील सरकारी वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. युवराजांवर मायो क्‍लिनिकमध्ये उपचार सुरू होते, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे. मात्र त्यात आजारपणाबाबतचा अधिक तपशील दिला गेलेला नाही.

युवराज खलिफा यांचे सामर्थ्य आणि संपत्ती बहारीनमध्ये सर्वत्र बघायला मिळते. बहारीनमधील राजांच्या तैलचित्राबरोबर युवराज खलिफा यांचेही तैलचित्र अनेक दशकांपासून लावले जात असे. युवराज खलिफा यांच्या स्वतःच्या मालकीचे एक बेटही आहे. त्यावर ते विदेशी पाहुण्यांना भेटत असत.

या बेटावर मोर आणि हरणेही मुक्‍तपणे संचार करत असतात. त्यांचे रहाणीमान जुन्या काळातील आखाती राजांना शोभेल असेच होते. मात्र त्यांच्या या रहाणीमानाला 2011 मध्ये शिया बहुल समुदायाने आव्हान दिले होते. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.