ब्रिटननंतर आता ‘या’ देशाने फायझरच्या लसीला दिली मंजुरी

न्यूयॉर्क : कोरोनामुळे संपूर्ण जग एकीकडे त्रस्त आहे. तर दुसरीकडे लसीचा विकास आणि उपलब्धता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आठवड्यात ब्रिटनने कोरोनावरील फायझर-बायोएनटेक लसीला आरोग्य विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण ब्रिटेनमध्ये उपलब्ध असेल. ब्रिटेननंतर आता बहरीनने देखील फायझर-बायोएनटेक निर्मित BNT162b2 या लसीला मंजूरी दिली आहे. ब्रिटेननंतर कोविड-19 लसीला मंजूरी देणारा हा दुसरा देश ठरला आहे.

बहरीनचे राष्ट्रीय हेल्थ रेगुलेटरी अथॉरिटीचे सीईओ डॉक्टर मरियम अल जलहमा यांनी देखील या लसीला मंजूरी दिल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. आरोग्य विभागाकडून मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच ही लस आपात्कालीन वापरासाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी ब्रिटेनच्या हेल्थ अँड सोशल केअर चे मीडिया प्रवक्ते डॉक्टर मरियम अल जलहमा यांनी फायझर-बायोएनटेक लसीबद्दल बोलताना सांगितले की, सरकारने स्वतंत्र औषध आणि हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) च्या सूचनेनुसार, सरकारने 2 डिसेंबर रोजी फायझर-बायोनोटेकच्या कोविड-19 लस वापरण्यास मान्यता दिली आहे. लसीच्या सुरक्षिततेच्या कठोर मानकांनुसार, गुणवत्ता आणि प्रभावीपणाचे आणि कित्येक महिन्यांच्या कठोर चाचण्यांनंतर डेटाचे सखोल विश्लेषण केल्यानंतर एमएचआरएच्या तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे.

फायझर-बायोएनटेक च्या कोविड-19 वरील लसीला परवानगी देऊन ब्रिटन जगातील पहिला देश ठरला. दरम्यान, आता भारतातही कोविड-19 लसीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नसून येत्या काही आठवड्यात लस देशात उपलब्ध होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.