मुंबई – बॉलिवुड मधील बाजीगर (Baazigar Movie) चित्रपटाला तीस वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमीत्त अभिनेत्री काजोलने (Kajol) या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला. 12 नोव्हेंबर 1993 रोजी रिलीज झालेला, ‘बाजीगर” शाहरुख खान (Shahrukh khan) काजोल जोडीचा यशस्वी चित्रपट ठरला होता.
काजोललाही या चित्रपटाने स्थीरता आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. अब्बास-मस्तान (Abbas Mastan) यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्याच्या कथानकाच्या आणि अनु मलिकच्या (Annu Malik) जबरदस्त संगीतामुळे ब्लॉकबस्टर ठरला. यात जॉनी लीव्हरचीही महत्वाची भूमिका होती.
आजच्या दिनानिमत्त काजोलने बाजीगर चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळचे अनेक फोटो एक्सवर शेअर केले, त्यावेळच्या आठवणी नमूद करताना तिने म्हटले आहे की, बाजीगरला 30 वर्षे पूर्ण होत आहेत.सरोजजींसोबत मी पहिल्यांदा काम करत होते. अनेक बाबींसाठी हा चित्रपट पहिला ठरला होता. अन्नुमलिक यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात मी पहिल्यांदाच भूमिका केली होती. (Baazigar Movie completed 30 years)
#Baazigar completes 30 years.. This set was a whole lot of firsts .. The first time I worked with Saroj Ji, the first time I met @iamsrk . The first time I met @The_AnuMalik … and me all of 17 when I started the film .. Abbas bhai and Mustan bhai actually treated me with all the… pic.twitter.com/OR5YWfbzlW
— Kajol (@itsKajolD) November 12, 2023
अब्बास भाई आणि मस्तान भाई यांच्याबरोबरचीही माझी पहिलीच फिल्म होती. त्यांनी मला त्यांच्या मुलीप्रमाणेव वागवले. जॉनी लिव्हर आणि शिल्पा शेट्टीबरोबरच्या अनेक आठवणीने मला आजही हसू येते. या चित्रपटात राखी, सिद्धार्थ, अनंत महादेवन, डब्बू मलिक, आदि इराणी आणि रेश्मा टिपणीस यांच्याही भूमिका होत्या. (Bollywood Movie)