जुन्नर – येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाला बॅंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून बी + श्रेणी मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी दिली.
महाविद्यालयाच्या विविध विभागांची तपासणी व पाहणी तेलंगाना येथील काकतीया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी वेंगटरत्नम व गुजरातमधील कार्डी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय गोर यांनी केली. समितीला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष. ऍड. संजय काळे, विश्वस्त मंडळाचे सदस्य, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक आणि अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी यांनी माहिती दिली. नॅक अहवाल पूर्तता समितीचे समन्वयक डॉ. रविकांत कासार, प्रा. सुधीर जोशी, प्रा. अनिल कहाणे, प्रा. डॉ. तुषार कांबळे, प्रा. डॉ. विनायक लोखंडे, प्रा. डॉ. अभिजित पाटील, प्रा. डॉ. महादेव वाघमारे, प्रा. डॉ. सतीश जाधव व प्रा. संतोष काळे, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.