राष्ट्रीय पोषण आहार दिनानिमित्त मानुषी छिल्लरने पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावरच्या अभियानाची सुरुवात केली आहे. “मिस वर्ल्ड’ सौंदर्यस्पर्धेपूर्वी आपण कसे आरोग्यदायी आहार घ्यायला सुरुवात केली होती याची माहिती देणारा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आपण जो आहार घेतो, त्यावरच आपली प्रकृती अवलंबून असते आणि योग्य पोषण मूल्य असलेल्या आहारामुळेच आपल्यातील रोगप्रतिबंधक शक्ती अबाधित राहते, असे तिने सांगितले. आपल्यामध्ये ही समज आपल्या पालकांमुळे निर्माण झाली.
View this post on Instagram
Stoked to be joining the #adidas family /// team #threestripes forever 💪 @adidas
त्याशिवाय सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले असल्यामुळेही आपल्याला यातील ज्ञान मिळाल्याचे तिने आवर्जुन सांगितले. कुपोषणामुळे आपली आतून हानी होत असते. हा दीर्घकालीन तोटा आहे. त्याबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.
म्हणूनच सोशल मीडियावर एक अभियान सुरू करण्याची गरज आपल्याला जाणवल्याचे तिने सांगितले. बिग बजेट फिल्म “पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमारबरोबर ती आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे.
याशिवाय यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली एका कॉमेडी सिनेमात ती विकी कौशलबरोबरदेखील असणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.