हॅरिस पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावरील जुन्या हॅरिस पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. तरीही तो अद्याप वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. त्यामुळे उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.

महापालिकेने जुन्या हॅरिस पुलावरील पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे येणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या वर्षी हाती घेतले होते. या पुलाची डागडुजी करीत असताना खालच्या बाजूस आलेली वड, पिंपळाची झाडे काढून त्या ठिकाणी केमिकल प्रक्रिया करण्यात आली होती. या पुलाचे बांधकाम दगडी असल्याने अनेक ठिकाणी त्याचे ग्राउटिंग करून पूल भक्कम करण्यात आला आहे. पुलाच्या वरच्या बाजूलाही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी तो वाहतुकीसाठी अद्याप खुला करण्यात आलेला नाही.

जुन्या हॅरिस पुलालगतच्या भागामध्ये नवीन पूल बांधण्यात आल्याने या ठिकाणी पूर्वी होणारी वाहतूक कोंडीची समस्या आता कमी झाली आहे. पावसाळ्यात बऱ्याचदा वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे लवकर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जुन्या हॅरिस पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे आणि अन्य किरकोळ स्वरूपाची कामे होणे अद्याप बाकी आहे. पंधरा दिवसांत ही कामे पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे हा पूल खुला होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा अवधी लागू शकतो. असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.