“या’ कंपनीकडून विमा पॉलिसी घेऊ नका

विमा नियंत्रकांची जनतेला सूचना

नवी दिल्ली – विमा क्षेत्र नियंत्रक म्हणजे आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने सर्वसामान्य जनतेने डिजिटल नॅशनल मोटार इन्शुरन्स या कंपनीकडून विमा पॉलिसी घेऊ नये असे आवाहन केले आहे.

बॅंगळूरुमधून काम करणाऱ्या डिजिटल नॅशनल मोटार इन्शुरन्स कंपनीने काही लोकांना विमा पॉलिसी वितरीत केल्या. या पोलिसी बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित नागरिकांनी आयआरडीएआयकडे याची माहिती कळविली. आयआरडीएआयने या कंपनीची शहानिशा केली असता ही कंपनी परवानगी न घेता विमा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे.

डिजिटल नॅशनल मोटार इन्शुरन्स कंपनीला आम्ही विमा देण्याचा परवाना दिलेला नाही, असे आयआरडीएआयने स्पष्ट केले आहे. या कंपनीने केलेल्या कामकाजाची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेने या कंपनीकडून विमा पॉलिसी घेऊ नये असे आयआरडीएआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.