मेलबर्न – स्पेनचा जागतिक स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या विशेषतः या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्याची नदालची ही विक्रमी 13 वी वेळ आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या सोमवारी झालेल्या सामन्यात नदालने जागतिक क्रमवारीतील 16 व्या मानांकित फाबीओ फॉगिनीचा 6-3, 6-4 व 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला व थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिलासेट जिंकल्यावर नदालने फॉगिनीला प्रतिकार करण्याची फारशी संधीच दिली नाही व अमेरिकन ओपन स्पर्धेची पुरनावृत्ती टाळली.
त्या स्पर्धेत फॉगिनीनेच नदालचा पराभव करत धक्कादायक निकाल नोंदवला होता. या फेरीत आता नदालची लढत पाचव्या मानांकित स्टेफनस त्सित्सिपास व मॅटीओ बेरेनेट्टी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा नदालचा 43 वा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ठरणार आहे.
या स्पर्धेचे यंदा नदालने विजेतेपद पटकावले तर तो रॉजर फेडररच्या 20 विजेतेपदांना मागे टाकत ही कामगिरी आपल्या नावावर जमा करेल.