सौदीच्या तेल कंपनीवरील हल्ल्याचा जगातील तेलाच्या किंमतींवर परीणाम

कच्च्या तेलाच्या किंमतीत दहा टक्‍क्‍यांहून अधिक वाढ

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हुडीच्या बंडखोरांच्या हल्ल्यानंतर त्याचा परिणाम जगभरातील तेलाच्या किंमतींवर झाला आहे. तेलाच्या बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत दहा टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. या हल्ल्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिकेने तेहरान समर्थीत हुडी बंडखोरांना दोषी ठरवत आहे. तसेच याचे इराणला परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारादेखील दिला. मात्र इराणने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सौदी अरेबियाच्या तेल कंपनीवर हल्ला झाल्यानंतर येथील उत्पादन निम्म्यावर आले आहे. हॉंगकॉंग तेल बाजारातील माहितीनुसार सोमवारी ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल 11.77 टक्‍क्‍यांनी वाढून 67.31 अमेरिकन डॉलरवर गेले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ यांनी सौदी अरेबियाच्या तेलाच्या क्षेत्रात ड्रोन हल्ल्यासाठी इराणला दोषी ठरवले आहे. देशाच्या जवळपास निम्म्या तेल क्षमतेत किंवा दैनंदिन जागतिक तेलाच्या पुरवठ्यातील 5 टक्के विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सौदी अरेबियामधील सर्वात मोठे तेल क्षेत्रांपैकी एक म्हणजे हिज्र खुरैस, दररोज सुमारे 1.5 दशलक्ष बॅरेल उत्पादन करतो. दरम्यान, जगातील सर्वात मोठा क्रूड तेलाचा साठा असलेल्या अमराकोवर 10 ड्रोनने हल्ला केला.

Leave A Reply

Your email address will not be published.