पॉम्पेओ यांच्याशी जयशंकर यांची चर्चा

नवी दिल्ली – भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांच्याशी आज भारताचे विदेश मंत्री एस.जयशंकर यांनी द्विपक्षीय बाबींवर चर्चा केली. पॉम्पेओ हे कालच भारतात दाखल झाले असून त्यांनी आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी एस. जयशंकर यांच्याशीही औपचारीक बोलणी केली.

लवकरच जपान मधील ओसाका येथे जी 20 परिषद होत असून त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पॉम्पेओ यांच्या भारत भेटीला महत्व आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने भारताचा व्यापार प्राधान्य दर्जाही काढून घेतला आहे त्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांतील वरीष्ठ पातळीवरील ही पहिलीच चर्चा आहे.

भारत अमेरिकेकडून एस-400 क्षेपणास्त्रांसह अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे घेणार आहे. त्या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. एच वन बी व्हीसावरील निर्बंध, इराणकडून तेल आयात करण्यास अमेरिकेने भारताला केलेला प्रतिबंध या अनुषंगानही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. तथापी या चर्चेचा तपशील मात्र अधिकृतपणे देण्यात आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.