प्रयागराज – गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुलेआम हत्या केली. पोलीस या दोन्ही गॅंगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशी हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करत या हत्येची चौकशी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाचे वकिल विशाल तिवारी यांनी केली आहे. याशिवाय तिवारी यांनी 2017 पासून झालेल्या 183 एनकाऊंटरचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम यांच्या हत्येप्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या समोरच ही सर्व घटना घडल्याने अनेक जण यावर टीका करत आहे.
तर दुसरीकडे, एमआयएम नेते वारीस पठाण यांनी देखील गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कमिटी नेमण्यात यावी अशी मागणी केली आहे. यापूर्वीच अतिक अहमदने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी त्यांच संरक्षण करण्याचे यूपी सरकारने देखील सांगितलं होतं. तरीही पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक अहमद व त्यांचा भाऊ अशरफची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
या घटनेची देशरात चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने चौकशीसाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली. त्यानुसार चौकशी आयोगाला संपूर्ण अहवाल सरकारला दोन महिन्यांत द्यावा लागणार आहे. सध्या या प्रकरणातील लवलेश तिवारी, अरुण मौर्य, सनी या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.