Ronit Roy – आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड आणि टीव्हीच्या दुनियेत स्वतःचे नाव कमावणारा रोनित रॉय सर्वानाच माहिती आहे. सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 58 वर्षीय अभिनेत्याने पत्नी नीलम बोस रॉयसोबत पुन्हा लग्न केले आहे.
View this post on Instagram
रोनितने त्याच्या 20 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी पत्नीसोबत पुन्हा लग्न केले आहे. या अभिनेत्याने आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
रोनित रॉयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपे 20 वर्षांनंतर पुन्हा लग्नाच्या सात वचनांची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. गोव्यातील एका शिवमंदिरात दोघांचा विवाह झाला. लग्नादरम्यान, अभिनेत्याची पत्नी नीलम नवविवाहित वधूप्रमाणे लाल साडी नेसलेली होती आणि दागिन्यांनी सजलेली होती, तर अभिनेता पांढरा आणि लाल कुर्ता-पायजमा परिधान केलेला दिसत होता.
रोनित आणि नीलमचा 16 वर्षांचा मुलगा अगस्त्य बोस देखील त्याच्या पालकांच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसला. वधू आणि वर रोनित आणि नीलम यांनी हवन केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोनित – नीलमने लग्नाची संपूर्ण विधी पार पाडल्या. यावेळी अभिनेत्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्र दिसले. रोनित रॉयने अभिनेत्री आणि मॉडेल नीलम सिंहसोबत 2003 मध्ये दुसरे लग्न केले होते. नीलमला साडेतीन वर्षे डेट केल्यानंतर अभिनेत्याने लग्न केले. पुन्हा एकदा लग्न केल्याने सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.