काबूल – तालीबानने प्रसार माध्यमांचे संचालक आणि अफगाण सरकारच्या निदेशकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अफगाणिस्तान सरकारचे माध्यम आणि माहिती संचालक दावा खान मेनपाल यांची काबूलमध्ये हत्या करण्यात आली आहे. दावा खानच्या हत्येची जबाबदारी तालीबानने स्वीकारली आहे.
दावा खान अलीकडच्या काळात पाकिस्तानी प्रॉक्सी वॉरच्या विरोधात सातत्याने बोलत होते. दावा खान हे अफगाणिस्तान सरकारचे माजी प्रवक्ता राहिले आहे. अफगाणिस्तानात तालीबानचा हिंसाचार अव्याहतपणे सुरू आहे.
बुरखा न घातल्याबद्दल तालीबानने एका मुलीची हत्या केली आहे. गेल्या आठवड्यात तालीबानने प्रसिद्ध अफगाण कॉमेडियनची हत्या केली. 5 ऑगस्ट रोजी तालीबानने प्रसिद्ध अफगाण कवी आणि इतिहासकार अब्दुल्ला अतीफी यांची हत्या केली.