हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी(दि.6) टोकियो ऑलिम्पियन सोनम मलिक, आशियाई चॅम्पियन अमन सेहरावत आणि किरण बिश्नोई यांनी कुस्तीमध्ये आपापल्या गटात कांस्यपदक जिंकले, परंतु कुस्तीपटू बजरंग पुनियाला फ्रीस्टाइल 65 किलो कुस्ती प्रकारात जपानच्या कैकी यामागुचीकडून कांस्यपदकाचा सामना गमवावा लागला. आज जिंकलेल्या तीन पदकांसह, आशियाई क्रीडा 2023 मधील कुस्तीतील पदकांची संख्या पाच (सर्व कांस्य पदके) झाली आहे.
भारताचा ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्याकडून देशाला 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, त्याला कांस्यपदकही जिंकता आलं नाही. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत बजरंगचा जपानच्या कैकी यामागुची यानं 10-0 ने पराभव केला. त्याआधी उपांत्य फेरीत इराणच्या अमौजदखली रेहमानकडून 8-1 असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत बहरीनच्या अलिबेगोव्ह अलिबेग सागिदगुसचा पराभव केला होता. तसेच उपउपांत्यपूर्व फेरीत बजरंगने फिलिपाइन्सच्या तुबोग रोनिलचा 10-0 असा पराभव करत पदकाची आशा कायम राखली होती. मात्र, त्याच्याकडून इराणच्या स्पर्धकाविरुद्धच्या लढतीत अत्यंत सुमार खेळ झाला व त्याला सुवर्णपदकाच्या शर्यतीततून बाहेर पडावे लागले. त्यांनतर त्याला ब्रॉंझपदकाची संधी होती, मात्र ती ही बजरंगने गमावली आहे.
अमन सेहरावतनं पटकावलं कांस्यपदक
The Medal Haul of 🇮🇳 #Wrestling Brigade going super strong at #AsianGames2022
Another🥉from #TOPSchemeAthlete Aman Sehrawat in Men’s Freestyle 57kg after defeating 🇨🇳’s Liu Minghu 11-0
Many congratulations Aman 🥳#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/GEvJz3ATRo
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023
आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनाच्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या अमन सेहरावतने तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे चीनच्या लिऊ मिंग्यूचा 11-0 असा पराभव केला. या 20 वर्षीय भारतीय कुस्तीपटूने एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
सोनमने कुस्तीत जिंकले कांस्यपदक…
The glory of 🇮🇳 #Wrestling🤼♀ Squad continues at #AsianGames2022
Adding another🥉to India’s existing medal tally, #TOPSchemeAthlete @OLYSonam defeats 🇨🇳’s Jia Long 7-5 in Women’s Freestyle 62kg
Many congratulations Sonam!👏#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/4RsQqulT44
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023
भारताची कुस्तीपटू सोनम मलिकने महिलांच्या फ्रीस्टाइल 62 किलो वजनी स्पर्धेत चीनच्या लाँग जिया हिला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. सोनमने उपांत्य फेरीत मुन ह्योंगयोंगकडून पराभूत होण्यापूर्वी नेपाळच्या सुशीला चंद आणि मंगोलियाच्या नोर्न सॉर्नविरुद्ध विजय मिळवला होता. 21 वर्षीय सोनम मलिकने अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक पटकावले आहे.
किरण बिश्नोईनं पटकावलं कांस्यपदक…
Another Blazing #Bronze in Wrestling🤼♀ at #AsianGames2022
Kiran Bishnoi defeats 🇲🇳’s Ganbat Ariunjargal 6⃣-3⃣ to grab the second🎖️of the day in Wrestling 🥳
Heartiest congratulations champ💪🏻#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/QaimqRJc27
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023
दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या किरण बिश्नोईने महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो वजनी गटात मंगोलियाच्या अरियुंजर्गल गानबतविरुद्ध 6-3 असा विजय नोंदवत कांस्यपदक जिंकले. तत्पूर्वी, किरणने जपानच्या नोडोका यामामोटोचा पराभव केला होता, परंतु उपांत्य फेरीत जमिला बाकबेर्गेनोव्हाकडून पराभूत होऊन कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला.