#AsiaCup2023 Super-4 #INDvPAK Match updates : कोलंबोमध्ये पाऊस थांबला आहे. मैदानावरील कव्हर हटवले गेले आहेत.पाऊस इतका जोरात होता की मैदान ओले झालंं आहे. मैदान सुकवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. संध्याकाळी 6.22 पासून ओव्हर्स कमी करण्यास सुरुवात होईल.
सामना अधिकारी आजचा सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. जर आज अजिबातचं सामना होऊ शकला नाही, तर जिथ थांबला होता तिथंपासून उद्याच्या राखीव दिवशी सामना सुरू होईल. आज जर डकवर्थ लुईस नियम आला आणि भारतीय संघ पुन्हा फलंदाजी करू शकला नाही, तर पाकिस्तानला लक्ष्य दिले जाईल.
डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 20 षटकांत 181 धावा, 21 षटकांत 187 धावा, 22 षटकांत 194 धावा, 23 षटकांत 200 धावा आणि 24 षटकांत 206 धावांचे लक्ष्य मिळेल.
पाकिस्तानसमोर हे लक्ष्य असू शकते…
20 षटकात 181 धावा
21 षटकांत 187 धावा
22 षटकात 194 धावा
23 षटकात 200 धावा
24 षटकात 206 धावा
मुसळधार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवावा लागला. सामना थांबला तेेेेेव्हा टीम इंडियाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 38 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली आहे.
या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.आज जर पावसामुळे सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ उद्या 24.1 षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.
दरम्यान, यापूर्वी प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे तुफान पाहायला मिळाले. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली.त्याने कर्णधार रोहितला बाद केले.
हिटमॅनने आपले 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्याचवेळी शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुभमन गिल 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला.