मुलतान :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत नेपाळविरुद्ध एकदिवसीय कारकीर्दीतील 19वे शतक साकार करताना 151 धावांची खेळी केली.
यासह तो पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक शतके फटकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज सईद अन्वरने 20 शतके फटकावली आहेत. अन्वरची कामगिरी मागे टाकण्यसाठी बाबरला आता दोन शतकांची गरज आहे.
तसेच बाबरने ही कामगिरी करताना सर्वात जलद 19 शतके साकारण्याचा विक्रम करत भारताचा विराट कोहली व दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला यांना मागे टाकले आहे.
बाबरने 102 डावांत 19 शतके केली आहेत. आमलाने 104 डावांत, कोहलीने 124 डावात, डेव्हिड वॉर्नरने 139 तर, एबी डिव्हिलियर्सने ही कामगिरी 171 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.