Asia Cup 2023 Pak vs Nep : कर्णधार बाबर आझमच्या दीडशतकी आणि इफ्तिखार अहमदच्या शानदार शतकी खेेेेेेेळीच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना नेपाळसमोर 343 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने 50 षटकांत 6 बाद 342 धावा केल्या.
पाककडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 151 धावा केल्या. त्याने 131 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार आणि चार षटकार मारले. इफ्तिखार अहमदने 71 चेंडूत 109 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि चार षटकार मारले. बाबरच्या कारकिर्दीतील हे 19 वे शतक आहे. त्याचवेळी इफ्तिखारने पहिले शतक झळकावले.
यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 44 धावांचे योगदान दिले. फखर जमान 14 धावा करून बाद झाला. इमाम-उल-हक आणि आगा सलमानने प्रत्येकी पाच धावा केल्या. त्याचवेळी शादाब खान 4 धावा करून बाद झाला.
नेपाळकडून गोलंदाजीत सोमपाल कामीने दोन बळी घेतले तर करण केसी आणि संदीप लामिछाने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.