रेडा -शिक्षकदिनीच इंदापूर तहसील कचेरीसमोर आश्रमशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनास सुरुवात झाली. हे आंदोलन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
निवेदनात मागणी केलेल्या सर्व मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा मखरे यांनी दिला आहे. करोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित द्या, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, आदी मागण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे.