पाटणा – बिहारमध्ये महादलित जमातीच्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. तर अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. पुर्निया जिल्ह्यात हा प्रकार घडला.
त्या जिल्ह्यातील चांदपूर भंगाहन गावात शुकवारी रात्री काही अज्ञात बंदूकधारी महादलित जमातीच्या एका कुटुंबाच्या घरात शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबीयांना मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यातील दोघांची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
त्यांच्या गोळीबारात याच घरातील अन्य तीन जण जखमी झाले आहेत. अनमोल श्रृषी, सुबोध श्रृषी अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र त्यांनी या प्रकरणाचा अधिक तपशील दिला नाही.
जखमींपैकी एकाने सांगितले की आमच्या घरावर 50 जणांच्या जमावाने लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला व नंतर त्यांनी गोळीबारहीं केला.