Asaduddin Owaisi – तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशात एआयएम-आयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तेलंगणात चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे, एआयएमआयएमचीही राज्यात चांगली पकड आहे. अशात दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांवरून राजकीय युद्ध सुरू आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाजपची बी टीम असल्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि म्हणाले की, ‘राहुल गांधी कोणत्या टीमचे आहेत हे सर्वांना माहीत आहे. तेलंगणा विधानसभेसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 नोव्हेंबरला निकाल कळणार आहे.
#WATCH | On Congress MP Rahul Gandhi, AIMIM MP Asaduddin Owaisi says, “…If you call (us) B team, then should I say from which team you are?… I say to Rahul Gandhi, come to Hyderabad and compete with me in parliament elections…”(02.11) pic.twitter.com/K0NLRRQw1a
— ANI (@ANI) November 3, 2023
नेमकं काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ?
असदुद्दीन ओवेसी यांनी एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हैदराबादमध्ये येऊन त्यांच्याशी स्पर्धा करण्याचे आव्हान दिले.ओवेसी पुढे म्हणाले, “28 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला एकच गोष्ट ऐकायला मिळेल, मोदी येतील आणि म्हणतील की सुकाणू हातात आहे, राहुल येऊन म्हणतील की ओवेसी भाजपची बी टीम आहे. बी टीम नाही, जर तुम्ही बी टीम म्हणाल तर तुम्ही कोणत्या टीमचे आहात मग मी तुम्हाला सांगू? तू कुठून आलास मी तुला सांगू का? मी आधीच सांगितले आहे, राहुल गांधी, हैदराबादला या आणि माझ्याशी स्पर्धा करा.’
ते म्हणाले ,’माझं नाव असदूद्दीन आहे, म्हणून तुम्ही असे आरोप करता. माझ्या चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता की मी पैशांनी विकला जाणार आहे. तुमचा मित्र सिंदिया भाजपात गेले तर त्यांनी पैसे घेतले असं नाही म्हणालात तुम्ही. पण चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी घालणाऱ्यावर तुम्ही आरोप केले. आता चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी घालणाराच तुम्हाला सांगेल की याची काय किंमत चुकवावी लागेल”
असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना आव्हान देत लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले. ओवेसी पुढे म्हणाले, ‘मी संघ आहे तर तुम्ही काय आहात? मी तुम्हाला (राहुल गांधी) आव्हान देतो की, तुम्हीही या आणि तुमची टीम आरएसएसला घेऊन या आणि माझ्याशी लोकशाही पद्धतीने स्पर्धा करा. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण तेलंगणात काँग्रेस फक्त मी आणि एआयएमआयएम पाहते.’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमवर मोठा दावा केला आणि म्हटले की जिथे काँग्रेस भाजपशी स्पर्धा करते तिथे एआयएमआयएम भाजपकडून पैसे घेऊन उमेदवार उभे करते.