सलमान खानच्या बहुचर्चित दबंग सिरीजमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच दबंग-३ चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटातील व्हिलनचा लूकही रिलीज करण्यात आला आहे. व्हिलनच्या भूमिकेत सुदीप किच्चा झळकणार आहेत.
Villain jitna bada ho, usse bhidne mein utna hi mazaa aata hai.
Introducing Sudeep Kiccha as Balli in ‘Dabangg 3’.#KicchaSudeepInDabangg3@KicchaSudeep @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @saffronbrdmedia pic.twitter.com/vvZYvroHYF— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 8, 2019
सलमान खानने सुदीप किच्चाचा लूक सोशल मीडियावर शेअर करत ‘विलन जितना बड़ा हो, उससे भिड़ने में उतना ही मजा आता है’ सादर आहे सुदीप किच्चा दबंग-३ मधील बल्लीच्या रूपात, असे कॅप्शन दिले आहे.
‘दबंग 3′ रिलीज होईपर्यंत तो ट्विटर हॅन्डलचे नाव आपल्या रोलच्या नावाने, म्हणजे चुलबुल पांडे हेच नाव ठेवणार असल्याचे सलमानने जाहीर करून टाकले आहे. ‘दबंग ३’चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.