बॉलीवूडसह सर्वत्र सध्या टॅटूचे फॅड जबरदस्त वाढले आहे. विशेषतः बॉलीवूडने काढलेल्या टॅटू नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. सोशल माध्यमांमध्ये यांची चर्चा स्टारचा अधिकृत अकाऊंटवरून फॅन्सला कळत असते. मध्यंतरी करिना कपूर, दीपिका पादुकोण यांचे टॅटू गाजलेही होते. यातच आता पुन्हा एकदा बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचा टॅटू सोशल माध्यमांमध्ये गाजला आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना जॅकलिनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘पहिल्यांदा टॅटू’ या व्हिडिओमध्ये ती पहिल्यांदा टॅटू काढताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिन तिच्या मित्रांसोबत टॅटू काढत आहे. टॅटू काढताना जॅकलिन अगदी उत्साही दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, रेवती एस. वर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या सिनेमामध्ये पी.टी.उषा यांच्या बायोपिकसाठी जॅकलिन फर्नांडिस नाव चर्चेत आहेत.