भेंडा (प्रतिनिधी) – येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार डॉ. नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांची बिनविरोध निवड झाली.
कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखालील बिनविरोध झाली होती.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा आज सकाळी 11 वाजता कारखाना अतिथीगृहात पार पडली.
अध्यक्षपदासाठी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील व माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांचे एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.
यावेळी कारखान्याचे विद्यमान संचालक व मावळते अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, गोरक्षनाथ गंडाळ, भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम, शिवाजी कोलते,मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, लताबाई मिसाळ, ताराबाई जगदाळे, रत्नमाला नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचेसह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर बोलतांना नरेंद्र घुले पाटील म्हणाले, शेतकरी, कामगार-कष्टकर्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेबांची परंपरा आहे, ती पुढेही सुरूच आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर सर्व संचालक मंडळाने लोकनेते मारुतराव घुले पाटील स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यांनतर विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, दादा गंडाळ, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, रामभाऊ पाऊलबुद्धे, डॉ. रावसाहेब फुलारी, कामगार संचालक सुखदेव फुलारी, बापूसाहेब सुपारे, कामगार पतसंस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब लबडे, कृष्णा उगले, कारभारी गरड आदी उपस्थित होते.