पिंपरी – थंडीचा जोर आता ओसरत असून उकाडा वाढू लागला आहे. अवकाळी पाऊस, त्यानंतर वातावरणातील वाढलेला गारठा आणि आता पुन्हा उकाडा वाढला आहे.
नागरिक देखील वेगाने बदलत्या वातावरणामुळे त्रासले आहेत. आज दिवसभरात शहरातील कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे.
वातावरणातील बदलामुळे पुन्हा अवकाळीच्या हजेरीची शक्यता वर्तविण्यात आली होती. कमाल तापमान 33.6 अंश तर किमान तापमान 15.2 इतके नोंदविण्यात आले.
पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा