उत्तर प्रदेश: बसपा नेत्या मायावतींनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मायावती म्हणाल्या दलित समाज आजपर्यंत रोहित वेमुला, उना कांड विसरले नाहीत. राजस्थानच्या अलवर येथील घटनेवर नरेंद्र मोदी मी बोलण्याआधी गप्प होते. तसेच यावेळी मायावतींनी संपूर्ण देशातील महिलांना मोदींना वोट न करण्याचे आवाहन केले.
मायावती यांनी रविवारी सुद्धा मोदींवर निशाणा साधला होता. निवडणुकीत स्वार्थ साधण्यासाठी नरेंद्र मोदी छळ-कपट करतील, मात्र ५ वर्षात करोडो गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या केलेल्या दुर्दशेमुळे जनता त्यांना माफ करणार नाही.
दरम्यान, आज गोरखपूर येथील सभेत बोलताना मायावती म्हणाल्या, नरेंद्र मोदी आपल्या जनसभेत सांगत आहेत कि, विपक्ष दल मला शिवीगाळ करत आहेत. मात्र हे स्वाभाविक आहे कि कोणत्याही व्यक्तीला तेव्हाच शिव्या दिल्या जातात जेंव्हा ते तसे काम करतात,हे मोदींनी लक्षात घ्यायला हवे.
Mayawati in Gorakhpur: Apni jan sabhayo mein yeh bata rahein hain ki mujhe vipakshi dal mil kar aaye din nayi gaali de rahe hain, yeh swabhavik hai ki kisi bhi vyakti ko gaali tabhi di jaati hai jab veh gaali khane ka kaam karta hai,Sri Modi ko dhyaan mein rakh kar chalna chahiye pic.twitter.com/molrx8OaFV
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 13, 2019