Arvind Kejriwal Arrest। दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या वक्तव्याने खळबळ उडालीय. आप-काँग्रेस आघाडी झाल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. आप-काँग्रेस आघाडीचा भाजपाने धसका घेतला आहे, असा आरोप देखील भारद्वाज यांनी केला आहे.
सात जागांपैकी चार जागांवर ‘आप’ तर तीन जागांवर काँग्रेस Arvind Kejriwal Arrest।
आज दिल्ली माध्यमांशी संवाद साधताना भारद्वाज यांनी भाजपावर निशाणा साधला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने दिल्लीमध्ये एकत्र निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सात जागांपैकी चार ठिकाणी ‘आप’ पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर तीन मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार उभे केले जातील. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘आप’ आणि काँग्रेसने आघाडी करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या पसरविण्यास सुरुवात झाली की, आमची आघाडी होणारच नाही. पण आम्ही आघाडीवर एकमत करू, याबद्दल भाजपा आणि माध्यमांनाही कल्पना नव्हती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीमध्ये आमची आघाडी होणार नाही, याबाबत विधान केलं होतं. मात्र ज्या क्षणी आम्ही आघाडी करण्याची घोषणा करत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला, त्याचक्षणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातवे समन्स मिळाले असल्याची बातमी समोर आली.असे त्यांनी सांगितले.
ईडीच नाही तर सीबीआयदेखील केजरीवालांना अटक करणार Arvind Kejriwal Arrest।
पुढे “आम्हाला अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आता फक्त ईडीच नाही तर सीबीआयदेखील अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी पुढे येणार आहे”, असा मोठा दावा भारद्वाज यांनी केला आहे.
सौरभ भारद्वाज यांनी,”फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्याच्या कलम ४१ अ नुसार अरविंद केजरीवाल यांना नोटीस काढली जाईल. ती नोटीस केजरीवाल यांना दिल्यानंतर पुढच्या दोन-तीन दिवसांत अटक केली जाण्याची शक्यता आहे.” असे म्हटले.