महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक

दौंड- दौंड येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आणि महावितरण कंपनीचा खासगी ठेकेदार यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 29) रंगेहाथ पकडले. दौंडचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे (वय 45 रा. बारामती), तर महावितरणचे खासगी ठेकेदार विक्रम पाटणकर (रा. नानविज ता. दौंड) असे पकडण्यात आलेल्यांचे नाव आहे.

या घटनेची माहिती अशी की दौंड तालुक्‍यातील एका तक्रारदराचे मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठविणेसाठी संबंधितांनी तक्रारदाराकडून 60 हजार रुपये लाचेची मागणी करून 30 हजार रुपये खासगी व्यक्तीकरवी स्वीकारत असताना लालचलुजपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात ते अडकले. ही कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत चौधरी, पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई चिमटे व राऊत यांनी सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.